अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा जिल्हाध्यक्षपदी दिपकसिंह राजपूत

0

जळगाव: अखिल भारतीय क्षत्रीय महासभेची ओनलैन बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत विविध पदांची निवडही जाहीर करण्यात आली आहे. यात दिपकसिंह विजयसिंह राजपूत यांची जळगाव जिल्हयाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर हरिबंशसिंह, युवा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भागवत राजपूत, प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसींह राजपूत, युवा प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरसिंह राजपूत व संघटनेचे पदाधिकारी यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Copy