अक्षय कुमार आता ‘पृथ्वीराज चौहान’च्या भूमिकेत झळकणार !

0

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी आता एका भव्य ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. १९४८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवण्यासाठीचा संघर्ष असलेल्या ‘गोल्ड’ चित्रपटात अक्षय चमकला होता. त्यानंतर तो ‘केसरी’ या चित्रपटात योध्याची भूमिका साकारणार आहे. आगामी ऐतिहासिक चित्रपटात तो पृथ्वीराज चौहान ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.

१२ व्या शतकात उत्तर पूर्व भारतावर सत्ता गाजवणाऱ्या पृथ्वीराज चौहान यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. याचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत.

Copy