अक्कलकुवा तालुक्यात 1 हजार गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

अक्कलकुवा:कोरोनात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील निवडक गावातील सुमारे 1हजार गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

बागलाण सेवा समिती नंदुरबार/नाशिक व ग्रेट ईस्टर्न सी.एस.आर.फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, उमटी, बोखाडी, बेडाकुंड,चिवलउतार, तोडीकुंड,वाडीबार, भरकुंड,साकलीउमर या गावातील गरीब व गरजु कुटुंबांना तसेच रोजगार गमावून गुजरात राज्यातुन आपल्या मूळगावी परत आलेल्या सुमारे 500 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. याआधी बागलाण सेवा समितीने ‘तेरे देस होम्स’ या संस्थेच्या सहाय्याने 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे.आतापर्यंत 1हजार कुटुंबांना साहित्याचे वितरण करण्यात आलेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणवेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन आरोशी प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक पुष्पलता ब्राम्हणे यांनी उपस्थितांना कोरोना विषाणुपासुन बचावासाठी फिजिकल डिस्टंसिंग, वारंवार साबणाने हात धुणे,चेहऱ्याला, नाका – तोंडाला हात न लावणे आणि महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आदी प्रकारच्या सुचना देऊन कोरोनाबाबत माहिती दिली. जीवनावश्यक वस्तुंची वेगवेगळ्या संस्थाकडुन मदत मिळविण्यासाठी राजु शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. वस्तूंच्या वितरणासाठी तहसीलदार विजय कच्छवे यांनी सहकार्य केले. श्रीमती पुष्पलता ब्राम्हणे, श्रीमती आशालता पिंपळे,सुधीरकुमार ब्राम्हणे, स्वप्निल पवार यांनी परिश्रम घेऊन गरजु कुटुंबांपर्यत मदत पोहचविण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले.

Copy