अक्कलकुवा तालुक्यातील तीन महसूली मंडळात दुष्काळ जाहीर

0

नंदुरबार। अक्कलकुवा तालुक्यातील 3 महसूली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर करुन खालील सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर, 2018 या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे. अशा महसूली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करुन शासनाने मंजुरी दिलेली आहे.

जिल्हा अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यांनी अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा, खापर, मोरंबा या 3 महसूली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करुन खालील सवलती लागू करण्यास मंजुरी दिली आहे. जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सुट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, अशा सवलती उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.