अकलूद येथे महिला जळाली; उपचारार्थ दाखल

0

जळगाव : यावल तालुक्यातील अकलूद येथील 30 वर्षीय महिला 94 टक्के जळाल्याची घटना घडली. जळीत महिलेस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून जिल्हा पेठ पोलीसांनी महिलेची भेट घेत घटनेची माहिती घेतली.
अकलूद येथे वास्तव्यास असलेली विवाहिता मिरा प्रभाकर शेळके ह्या सकाळी गॅसवर दूध गरत करत होत्या. या दरम्यान, त्यांच्या साडीला अचानक आग लागली. यात त्या 94 टक्के जळाल्या. मिरा यांना लागलीच कुटूंबियांनी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, महिलेची प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते. यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या सुप्रिया देशमुख व अजितसिंग देवरे यांनी जिल्हा सामान्य रूग्णालय गाठत महिलेचे जबाब घेतले.