अकरावीतील मुलीला आमिष दाखवून पळविले

0

नंदुरबार। अकरावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तींनी पळून नेल्याची घटना नंदुरबार शहरात घडली. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील एकता नगरमध्ये राहणारी अकरावीत शिकणारी विद्यार्थिनी तिच्या बहिणीसह बोनफाईड जमा करण्यासाठी एकलव्य हायस्कूल मध्ये गेली होती. अभिनव हायस्कूल ते एकलव्य हायस्कूल या दरम्यान च्या रस्त्यावरुन तिला आमिष दाखवून कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी पळवुन नेले. अशी फिर्याद संगिता रवींद्र खैरनार यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.