अंनिसतर्फे शहाद्यात निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन

0

शहादा । कॉ. गोविंद पानसरेंच्या खुनाला दोन वर्ष पुर्ण झाले तसेच अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 42 महिना लोटले तरी राज्य शासनाची पोलिस यंत्रणा या खुनाचा तपास करु शकलेली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सकाळी 6:30 वाजता अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले स्मारक ते गांधीपुतळ्या दरम्यान निर्भय मॉर्निंग वॉक केले.

खुनाच्या तपासाच्या मागणीसाठी विविध प्रकारचे सप्ताहभर आंदोलने
विवेकाचा आवाज बुलंद करु या, लढेंगे जितेंगे, दम है कितना गोलीमें तेरे, देखा और देखेंगे अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. आगामी सप्ताहभर या खुनाच्या तपासाच्या मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलने संघटनेच्यावतीने केली जाणार आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी आरीफ मनियार, भारती पवार, हृदयेश चव्हाण, नयन तावडे, के.आर. पाडवी, रायसिंग वसावे, गिरधर बिरारे, राजेंद्र गुलाले, घनश्याम चव्हाण, गजानन कोळी, भटू वाकडे, विजय बोढरे, शाम भलकारे, प्रदीप केदारे आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

तपास जलदगतीने व्हावा
यावेळी सनातनच्या फरार साधकांना त्वरीत अटक करण्यात यावी व या दोन्ही खुनांचा तपास जलद गतीने व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष संभु पाटील, शाखा अध्यक्ष डॉ. बी.डी.पाटील, उपाध्यक्ष विनायक पवार, उपाध्यक्षा संगिता पाटील, संजय सोनार, डॉ. विनोद परदेशी, प्रा. लियाकत अली सैय्यद, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा सचिव खंडू घोडे, शाखाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निर्भय मॉनिर्ंग वॉक केले.