अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे फिरते नभांगण 4 दिवस चोपड्यात

0

चोपडा । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितिचे फिरते नभांगण 17 ते 29 जानेवारी रोजी चोपडा शहरात दाखल होणार आहे. शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडल संचलित आक्सफोर्ड इंग्लिश मेडीयम स्कूल येथे 17 जानेवारी; तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे 18 जानेवारी; महिला मंडल हायस्कुल येथे 19 जानेवारी व विवेकानंद हायस्कुल येथे 20 जानेवारी रोजी अशाप्रकारे दररोज संबधीत ठिकाणी प्रत्येकी 40 मिनीटांचा एक शो असे दररोज एकुण 10 शो केले जातील. त्यात भास्कर सदागडे (अनिंस) कार्यकर्ते हे ग्रह ता-यांशी दोस्ती व मनोंरजनातून विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करतील. विद्यार्थियांना संपूर्ण खगोल शास्त्रीय माहिती या 3 डी प्लनिटोरीयम च्या माध्यमातून देण्यात येईल. तरी संबधीत शालेतील विद्यार्थियांनी आपल्या वर्ग शिक्षकाशी संपर्क करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन अंनिस महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे, अंनिसचे स्थानिक संयोजक डॉ. अय्युब आर. पिंजारी व चोपड़ा तालुका अध्यक्ष डॉ. नरेंद्र एम. सिरसाठ यांनी केले आहे.