Private Advt

अंतुर्ली खुर्दच्या प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा : तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील एका 52 वर्षीय व्यक्तीचा सर्प दंशाने मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोपाल हारसिंग पाटील (52) असे मयताचे नाव आहे.

विषारी सर्पदंशाने केला दंश
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील रहिवासी गोपाल हारसिंग पाटील (52) हे शुक्रवार, 25 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतात जात असतांना त्यांना एका विषारी जातीच्या सर्पाने दंश केला. काही कळण्याच्या आत गोपाल पाटील हे बेशुद्ध पडले. त्यांना स्थानिक नागरीकांनी तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सूर्यकांत नाईक करीत आहेत.