अंतुर्लीच्या विवाहितेचा बाळंतपणानंतर चौथ्या दिवशी मृत्यू

0

मुक्ताईनगर- प्रसुती झाल्यानंतर चार दिवसांनी उपचारादरम्यान तालुक्यातील अंतुर्ली येथील 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील कुसुमश्री नर्सिंग होम या दवाखान्यात 25 रोजी घडली. डॉक्टरांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरातील कुसुमश्री नर्सिंग होम या दवाखान्यात 21 सप्टेंबर रोजी तालुक्यातील अंतुर्ली येथील तनिष्का रवी चौधरी (22) वर्ष ह्या प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. सिझरींगनंतर येथेच दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असताना 25 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ.विक्रांत जैस्वाल यांचे खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास भारस्के करीत आहेत.