अंतर्नादचा धुणी-भांडी करणार्‍या महिला, हात-मजुरांना मदतीचा हात

0

भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानने लॉकडाऊनच्या काळात पहिल्या टप्यात 80 कुटुंबांना आठवड्याचा किराणा वाटप केला. आठवडाभर पुरेल असा किराणा त्यात वाटप करण्यात आला. दुसर्‍या टप्यात अजून 100 कुटुंबाना मदत करण्यात येणार आहे. ‘एक हात मदतीचा’ उपक्रमार्ंत अंतर्नाद प्रतिष्ठानने स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनात गरजूंची भूक भागवण्याचा प्रयत्न केला. वरणगाव रोडवरील लाल जैन मंदिर परीसर (11 कुटुंब), कंडारी वीटभट्टीवरील कामगार (12 कुटुंब), मामाजी टॉकीज परीसरात धुणीभांडी करणार्‍या वृद्ध विधवा ( 7 कुटुंब), हातमजूर, आचारी, हॉस्पिटल वॉचमन, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे असलेले परराज्यातील मजूर, मंदिर पुजारी, दुकान कामगार (10 कुटुंब), दुसखेडा (ता. यावल) झोपडपट्टी रेल्वेलाइनच्या अलिकडील (22 कुटुंब), रेल्वे लाइनच्या पलिकडील (11 कुटुंब), भुसावळात धुणी-भांडारी करणारे व परराज्यातील मजूर (7 कुटुंब) अशा 80 कुटुंबांना पहिल्या टप्यात शिधा वाटप करण्यात आला. त्यात चार किलो गहू, दोन किलो तांदुळ, अर्धा किलो तूरडाळ, 1 किलो तेल, चटणीची दोन पाकिटे, एक साबण असे जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे पदाधिकारी व उपक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समिती सदस्यांनी गरजूंच्या घरापर्यंत जावून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांनीही केली मदत
लॉकडाउनच्या काळात शहरी भागातील शाळांमध्ये शासनातर्फे तांदूळ वितरीत करण्यात आला. मध्यमवर्गीय व सधन कुटूंबातील पालकांनी या उपक्रमासाठी 115 किलो तांदूळ दिला. सेंट अ‍ॅलायसेस स्कुलसमोर अंतर्नादच्या स्वयंसेवकांनी ही मदत स्विकारली. दुसर्‍या टप्यात हा तांदूळ आणि शिधा पाकीट गरजूंना वितरीत केले जाणार आहे.

हे आहेत दातृत्वाचे धनी
अंतर्नादच्या या उपक्रमाला माजी खासदार हरीभाऊ जावळे, अवधूत साठे, सागर मोहरील, वंदना भिरुड, विजय देवरे, संदीप राजपूत, ललित पाटील, किशोर पाटील, आबिद शेख, चिरागसेठ, रमेश सरकटे, सुनील धांडे, रंजीतकौर धारीवाल, दीपक चौधरी, दीपाली खर्चे, राजेंद्र जावळे, अलका देवगिरीकर, नीलेश वारके, स्मिता भोळे, मयुर इंगळे, जिजाबाई जंजाळे, श्रीकांत मोटे, भूषण चौधरी, शैलेंद्र वास्कर, रियाज तडवी, समाधान मुर्‍हे, परेश सपकाळे, क्रांती सुरवाडे, अनिल देशपांडे, पांडुरंग महाजन, विद्या सपकाळे, शरद हिवरे, सीमा न्हायदे, अमोल जावळे, रवी पाटील या दात्यांचे सहकार्य लाभले.

Copy