अंजनसोंडेत विनयभंगानंतर मारहाण : 25 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

0

कोळी बांधवांनी अन्याय न होण्यासाठी वरणगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा

भुसावळ- तालुक्यातील अंजनसोडे येथे विवाहिते महिलेचा विनयभंग झाल्यानंतर एका गटाने महिलेस मारहाण करीत घरातील सामानाचे नुकसान केल्याप्रकरणी 25 जणांविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली तर या प्रकरणी कोळी बांधवांवर अन्याय न होण्यासाठी वरणगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून कुणावरही अन्याय व्हायला नको, अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली.

महिलेचा विनयभंग करीत मुलाला मारहाण
अंजनसोंडे गावातील 45 वर्षीय महिला घरात असताना 15 ते 20 संशयीतांनी हातात लाठ्या-काठ्या, आसारी घेत घरात अनधिकृतपणे प्रवेश केला शिवाय या महिलेच्या मुलाच्या दुचाकीचे नुकसान करीत मारहाण करून शिवीगाळही केली तसेच घरातील सामानाची नासधूसही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे, हवालदार राहुल येवले, नागेंद्र तायडे, मधूकर भाल शंकर, संदीप बळगे, अतुल बोदडे, ज्ञानदेव सपकाळे आदींनी घटनास्थळ धाव घेत चौघा आरोपींना ताब्यात घेतले. संशयीत आरोपी दीपक कोळी, मुकेश कोळी, राणा कोळी, सागर गणेश कोळी, निवृत्ती कोळी यांचा मुलगा, ज्ञानेश्वर कोळी यांचा मुलगा, भैया संजय कोळी, सुकदेव कोळी यांचा मुलगा व इतर 10 ते 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या घटनेत 22 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अतुल ऊर्फ गोलू रवींद्र पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वरणगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा
या प्रकरणी कोळी समाज महासंघाच्या वतीने अध्यक्षा हेमलता सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या सरला कोळी, नारायण कोळी, महेश सोनवणे, रवींद्र सोनवणे, सदानंद उन्हाळे, रामचंद्र तायडे यांच्यासह दिडशे ते दोनशे महिला व पुरूषांनी मोर्चा काढून वरणगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांना या प्रकरणी कोळी समाज बांधवावर अन्याय होणार नाही याबाबत निवेदन दिले.