अंगुरी भाभीला साकारायची ‘मेरी कोम’ची भूमिका

0

मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय शो ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंची गुरी भाभी या नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे तिने टेलीव्हिजन शोच्या निर्मात्यांना मेरी कोमच्या जीवनावर आधारित एखादी मालिका किंवा कार्यक्रमाची निर्मिती करण्याचा आग्रह केला आहे. प्रियांका चोप्राने मोठ्या पडद्यावर ‘मेरी कोम’ची बायोपिक केली आहे.

आता ‘बॉक्सर मेरी कोम’ छोट्या पडद्यावरही यावी, त्यांच्या जीवनावर आधारित एखाद्या मालिकेची निर्मिती व्हावी आणि त्या मालिकेमध्ये मी त्यांची भूमिका साकारावी. छोट्या पडद्याचा प्रेक्षक वर्ग जास्त आहे. त्यामुळे मेरी कोमसारख्या प्रेरणादायी व्यक्तीवर एखाद्या कार्याक्रमाची निर्मिती झाली तर तरुणवर्गाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल’, असं शुभांगी म्हणाली.

Copy