अंगावर भाजी पडल्याने चिमुकली भाजली

0

जळगाव । यावल तालुक्यातील तुरखेडा येथे अंगावर गरम भाजी पडून एक वर्षीय चिमुकली भाजल्याची घटना घडली. दरम्यान, त्या चिमुकलीस जिल्हा सामान्य रुग्णालयातील जळीत विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पार्वती सिताराम बारेला या एक वर्षाच्या मुलीच्या अंगावर 19 रोजी सायंकाळी तुरखेड ता.यावल येथे घरात अंगावर गरम भाजी पडल्याने ती 18 टक्के भाजली आहे. तीच्या पाठीला व खांद्याला जखम झाल्या असून जिल्हा रुग्णालयात तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील कमल सोमा तायडे हे देखील जळाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ जिल्हा सामान्य रुगणालयातील जळीत विभागात उपचारार्थ दाखल केले आहे.