अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा 8 रोजी जि.प.वर मोर्चा

0

प्रलंबित मागण्यांचा समावेश

जळगाव: मध्यवर्ती कामगार संघटनांच्या घोषणापत्रातील मागण्यांचे समर्थन करण्यासाठी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या बुधवारी, 8 जानेवारी 2020 रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. संपात सर्वांनी भागिदारी करून सकाळी 11 वाजता जळगाव येथील जीएस ग्राऊंड (शिवतीर्थ मैदान) येथे गणवेश परिधान करून एकत्र जमावे आणि जिल्हा परिषदेवरील मोर्चा यशस्वी करण्याचे संघटनेचे रामकृष्ण बी. पाटील यांनी केले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे काम पूर्ण वेळ (8 तास मोजून) त्यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सेवेचे लाभ लागू करण्यात यावेत, समान किमान कार्यक्रमात केलेल्या नियोजनानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना तात्काळ मानधनवाढ लागू करण्यात यावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आजारपणाची रजा तसेच दरवर्षी उन्हाळी सुट्टी एक महिना देण्यात यावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार्‍या एक रकमी सेवासमाप्ती लाभात तीन पट वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी देशातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका 8 जानेवारी रोजी एक दिवसीय देशव्यापी संप करणार आहेत. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनी भागिदारी करुन संप व आपापल्या जिल्ह्यातील मोर्चे, निदर्शने, धरणे आदी आंदोलने यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Copy