अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गाचा मार्ग मोकळा !

खासदार डॉ हिना गावित यांच्या प्रयत्नांना यश

नंदुरबार- अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गाला तत्वत मान्यता मिळाली असून खासदार डॉ हिना गावित यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
अंकलेश्वर ब्रहानपूर हा मार्ग मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात यातील राज्याला जोडणारा महामार्ग असून गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यासाठी वाहनधारकांना त्रास भोगावा लागत होता. हा महामार्ग नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा शहादा तळोदा व शिरपूर या तालुक्यांचा समावेश असल्याने संसद रत्न खासदार डॉ हिना ताई गावित यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याच्या मंजुरीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, नामदार नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर यांनी अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समावेश करून याबाबतची अधिसूचना काढल्याचे स्पष्ट केले आहे. बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाणार आहे, हा राष्ट्रीय महामार्ग तळोदा शहादा शिरपूर चोपडा फैजपूर रावेर व बऱ्हाणपूर असा असणार असून सुद्धा खासदार डॉ हिना गावित यांच्या अथक परिश्रमाने आणि केलेल्या पाठपुराव्याने या राष्ट्रीय महामार्गाला आता तत्वतः मंजुरी मिळाली आहे

Copy